Ad will apear here
Next
अभ्यंकर विद्यालयात शारदोत्सवानिमित्त कीर्तनातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन
परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात कीर्तन सादर करताना कीर्तनकार किरण जोशी.

रत्नागिरी :
 ‘माणसाला मिळालेल्या पाच ज्ञानेंद्रियांचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे. शाळेतून घरी गेल्यावर मोबाइल दे, टीव्हीचा रिमोट दे, अशी मागणी मुले करतात. मोबाइलवर गेम खेळायला दे, असे सांगतात; पण असे करायचे नाही,’ असा संदेश देणारे संवादात्मक कीर्तन करून कीर्तनकार किरण जोशी यांनी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना बोलते केले.

या विद्यालयातील शारदोत्सवाला किरण जोशी यांच्या कीर्तनाने सोमवारपासून (३० सप्टेंबर) प्रारंभ झाला. या वेळी मुख्याध्यापक विनोद नारकर आणि सहशिक्षक उपस्थित होते. सौ. शिवलकर यांनी सूत्रसंचालन केले. कीर्तनामध्ये श्री. आरेकर यांनी कीर्तनकार जोशी यांचा सत्कार केला. वेदान्त जोशी याने तबला, शंतनू सावंत याने हार्मोनियम आणि विघ्नेश जोशी याने तालवाद्यसाथ केली.

कीर्तनकार किरण जोशी यांनी समर्थ रामदासांच्या मनाच्या श्लोकांचा संदर्भ देऊन मुलांनी कसे वागावे, याची शिकवण पूर्वरंगामध्ये दिली. रामायण, महाभारतासह छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद आदींच्या चरित्रातील संदर्भ त्यांनी दिले. क्रांतिकारकांच्या जीवनातील दाखलेही त्यांनी दिले. ‘मुलांनी आई-वडिलांचे ऐकले पाहिजे. राष्ट्रकार्यासाठी योगदान दिले पाहिजे,’ असा उपदेश त्यांनी केला. 

दर वर्षीप्रमाणे शारदोत्सवामध्ये भरत इदाते, सौ. बापट, मंजिरी लिमये, संदीप कांबळे व अंजली लिमये हे मान्यवर कथाकथन सादर करणार आहेत. तसेच बालसभेचे आयोजनही करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZQACE
Similar Posts
अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात बालसभा; गांधीजी, शास्त्रीजी यांना अभिवादन रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी रत्नागिरीतील अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात बालसभा आयोजित करण्यात आली होती. या बालसभेतून या नेत्यांना अभिवादन करण्यात आले.
अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात ढोल-ताशांच्या गजरात मुलांचे स्वागत रत्नागिरी : जवळपास दीड-दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर १७ जून रोजी शाळा पुन्हा सुरू झाल्या. त्यामुळे बालगोपाळांच्या किलबिलाटामुळे शाळांचा परिसर गजबजून गेला होता. रत्नागिरीतील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात पहिलीच्या वर्गातील सर्व मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language